त्र्यंबकेश्वर मध्ये त्रिपिंडी श्राद्ध पूजा करण्याचे फायदे
त्रिपिंडी श्राद्ध हा हिंदू धर्मातील सर्व विधींपैकी एक महत्वाचा विधी आहे. या विधीला पिंड दान विधी असेही म्हणतात. जर आपल्या परिवारात एखाद्या व्यक्तीचा म्रित्यू झाला असेल आणि मारताना ती व्यक्ती तरुण किंवा खूप म्हतारी असेल आणि त्या व्यक्तीचा अनेक इच्छा अपूर्ण राहिल्या असतील. तर अशा व्यक्तींचा आत्मा पुढील पिढीचा आयुष्यात अनेक समस्या निर्माण करत असतात. अशा व्यक्तींचा आत्म्याला मोक्ष प्राप्ती होण्यास समस्या येतात.
मेल्यानंतर व्यक्तीचा दार वर्षी श्राद्ध विधी करणे फार महत्वाचे असते. काही कारणांमुळे जर सलग तीन वर्ष एखाद्या व्यक्तीचा श्राद्ध विधी केला नाही तर अशा व्यक्तींचा आत्मा आपल्यावर चिडतात. अशा आत्मना शांती मिळवून देण्या साठी त्रिपिंडी श्राद्ध विधी करणे फार महत्वाचे असते.
अनेक लोकांना असे वाटते कि त्रिपिंडी श्राद्ध विधी फक्त मागील तीन पिढ्यांतील लोकांपुरतेच सीमित असते. पण असे नाही, कोणतीही व्यक्ती जेव्हा अचानक मरण पावते त्यावेळी त्या व्यक्तीचा अनेक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात अशा आत्मना अतृप्त आत्मा असेही म्हणू शकतो. या अतृप्त आत्मा त्यांचा पुढील पिंढ्यांचा जीवनात समस्या निर्माण करत असतात. त्यामुळं त्र्यंबकेश्वर येथे त्रिपिंडी श्राद्ध विधी करून अशा आत्मना आपण मोक्ष प्राप्ती करून देऊ शकतो.
त्रिपिंडी श्राद्ध विधी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराजवळ गोदावरी नदीकाठी ताम्रपत्रधारी पंडितांचा हातून केला जातो. या विधीत ३ पंडितांचा समावेश असतो. यात पितृदोष, अभिषेक अशा विधींचाही समावेश असतो. नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे त्रिपिंडी श्राद्ध विधी मोठ्या प्रमाणावर केले जाते.
त्रिपिंडी श्राद्ध पूजा केल्याने होणारे फायदे :
१) जेव्हा आपल्या पूर्वजांचा आत्मा या पूजेने शांत होतात त्यांना सद्गती प्राप्ती होते तेव्हा त्यांचा आशीर्वादामुळे आपल्या परिवारातील लोकांचा आयुष्यात सुख, शांती, संपत्ती आणि चांगले आरोग्य लाभते.
२) तुमचे व्यावहारिक, व्यावसाईक जीवन प्रगतिशील होते.
३) तुमचे व्यवहाइक जीवन सुधारते.
४) तुमचा आयुष्यात सकारात्मकता वाढते.
त्रिपिंडी श्राद्ध विधी हा कोणत्याही वयात मरण पावलेल्या व्यक्ती साठी केला गेला पाहिजे. हा विधी मेलेल्या व्यक्तीचा आत्म्याला शांती मिळवून देणे आणि त्यांना स्वर्गात जाण्यासाठी मदत करणे. दरवर्षी मेलेल्या व्यक्तीचा पुण्यतिथीचा दिवशी श्राद्ध विधी करणे आवश्यक आहे किंवा दर वर्षी पितृ पक्ष (भाद्रपद) महिन्यात श्राद्ध विधी केला जातो. जर यापैकी कोणते हि श्राद्ध तुम्ही सलग तीन वर्ष करू शकला नाहीत तर शारदा पाशामुळे त्या व्यक्तीचा आत्म्याला त्यांचा वर्तमान जीवनात अनेक वेदना भोगाव्या लागतात कारण आपले पूर्वज आपल्या द्वारे मोक्ष प्राप्तीची अपेक्षा करत असतात. यालाच पितृ दोष असेही म्हणतात. त्रिपिंडी श्राद्ध विधी या दोषापासून मुक्त होण्यास केला जातो . हा संपूर्ण विधी २ ते ३ तसंच असतो . त्र्यंबकेश्वर मध्ये हा विधी केला जातो. एकटी स्त्री त्रिपिंडी श्राद्ध विधी करू शकत नाही
त्र्यंबकेश्वर ला जाणार्यांना मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात. त्र्यंबकेश्वर मंदिर त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागबली, काल सर्प दोष सारख्या विशिष्ट विधींसाठी फार पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाण आहे .त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे त्रिमूर्ती चे प्रतीक आहे १) ब्रह्मदेव २) विशू देव ३) महादेव. त्रिपिंडी श्राद्ध विधी मध्ये त्रिमूर्ती भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भक्तीपूर्वक पूजा केली जाते. त्र्यंबकेश्वर मध्ये पूजा केल्याने सर्व नाराज पितरांना लवकर मोक्ष प्राप्त होतो. त्र्यंबकेश्वर मधील त्रिपिंडी श्राद्ध पूजेचा बुकिंग साठी तुम्ही thttps://www.trimbakeshwar.org/ या वेबसाइट ला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला त्र्यंबकेश्वर मध्ये पूजा करणाऱ्या ताम्रपत्रधारी पुरोहितांशी थेट संपर्क साधता येईल आणि तुमची पूजा बुक करता येईल.
त्र्यंबकेश्वर मध्ये श्राद्ध विधी का केला जातो :
एक प्राचीन धर्म ग्रंथ गरुडपुराण असे सांगते कि, व्यक्तीचा मृत्यूचा १३ दिवसानंतर त्या व्यक्तीची आत्मा यमपुरीकडे आपली यात्रा सुरु करते. यमपुरीत पोहोचण्यास त्या आत्म्याला १७ दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर आणखी ११ महिने प्रवास करून ती आत्मा यमराजाच्या दरबारात पोहोचते. त्या ११ महिन्याचा कालावधी त्या आत्म्याला अन्न , पाणी काहीही मिळत नाही. त्यामुळे या ११ महिन्याचा कालावधीत परिवाराने केलेले पिंड दान त्या व्यक्तीची भूक भागवण्यास मदत करते. त्यामुळे मृत्यू नंतर पहिल्या वर्षातील श्राद्ध विधी खूप महत्वाचे समजले जाते.