कुंभ विवाह । त्र्यंबकेश्वर पूजा
कुंभ विवाह म्हणजे काय ?
मुलींचा कुंडली मधील वैधव्य योग निवारणासाठी कुंभ विवाह केला जातो. मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हाच ग्रहस्थितीवरून तिची कुंडली काढली जाते. ग्रहांचा अचूक साथीमुळे काही मुलींचा कुंडली मध्ये लग्नानंतर चा आयुष्यात वैधव्य योग असल्याचे दिसते. वैधव्य योग असलेल्या मुलीने जर कुंभ विवाह केल्याशिवाय एखाद्या मुलाशी लग्न केले तर तिचा नवऱ्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. सतत अपघात होणे, लवकर मृत्यू होणे इत्यादी प्रकारचा घटना घडू शकतात, त्यामुळे कुंभ विवाह करून वैधव्य योग्य निवारण करून घेणे महत्वाचे असते.
जेव्हा मुलगी किंवा मुलगा जन्माला येतो तेव्हा जन्म वेळीच काही ठराविक ग्रहस्थितीमुळे विवाहानंतर चा आयुष्यात त्रासदायक ठरणारे दोष कुंडली मध्ये येऊ शकतात. वैधव्य योग्य, मंगल दोष, काल सर्प दोष इत्यादी हे वैवाहिक आयुष्या साठी त्रासदायक ठरू शकतात. हिंदू ज्योतिषशास्त्रात आणि हिंदू अध्यात्मात प्रत्येक दोष निवारणासाठी उपाय सुचवले आहेत.
कुंभ विवाह विधी :
नाशिक मधील १२ ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे कुंभ विवाह करणे फार शुभ मानले जाते.
प्रथम त्र्यंबकेश्वर मंदिराचा ऑफिसिअल वेबसाइट वरून तेथील अस्सल ताम्रपत्रधारी पंडितांशी संपर्क साधावा आणि तुमची पूजा बुक करून घ्यावी.
ताम्रपत्रधारी पंडित पूजेचा जो मुहूर्त सांगतील तेव्हा त्र्यंबकेश्वर मध्ये उपस्थित राहावे.
पंडित जी सांगतील ते कपडे परिधान करावे. ( काळे कपडे घालू नये )
तुम्हाला ताम्रपत्रधारी पंडितांकडून पूजेची संपूर्ण सामग्री पुरवली जाईल.
कुंभ विवाह विधी हि आपल्या पारंपरिक विवाह पद्धीतीने पार पडतो.
या मध्ये फेरे, कन्यादान इत्यादी सर्व क्रिया केल्या जातात.
कुंभ विवाहात मुलीचा विवाह एक कुंभात (मातीचा भांड्यात) ठेवलेल्या विष्णू देवाचा मूर्तीसोबत लावले जाते.
कुंभ विवाहा वेळी मुलीचे आई, वडील , भाऊ आणि मामा उपस्थित असणे महत्वाचे असते.
त्यानंतर स्वस्तिवाचना द्वारे पूजेसाठी संकल्प करून पूजा सुरे होते.
त्यानंतर कुंभावर विष्णू देवाची मूर्ती ठेवली जाऊन तिची पूजा केली जाते.
आणि कुंभ विवाह चा अखेरीस विष्णू देवाची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते.
त्यानंतर मुलीने सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन पूजा संपन्न होते.
कुंभ विवाह विधी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर मधील ताम्रपत्रधारी पंडित हे उत्तम पंडित आहेत. ताम्रपत्रधारी पंडित हे त्र्यंबकेश्वर चे खूप वर्षांपासूनचे रहिवासी आहे. नानासाहेब पेशवा यांनी त्र्यंबकेश्वर चा ज्ञानी पंडितांना फक्त हेच त्र्यंबकेश्वर चे अस्सल पंडित आहेत याचा पुरावा म्हणून ताम्रपत्रे बहाल केली होती. आज त्र्यंबकेश्वर चा मंदिरात आणि मंदिर परिसरात फक्त याच पंडितांना पूजा करण्याचा अधिकार आहे. त्यांचा हातून केलेली पूजा कधीही विफल होत नाही आणि पूजेचा अद्भुत अनुभव तुम्हाला मिळतो.
मंगल दोष :
मंगल दोष हा वैवहि जीवनात अडचणी निर्माण करणाऱ्या दोषांपैकी एक दोष आहे. मंगल दोष हा मंगल ग्रहाचा अचूक स्थिती मुळे निर्माण होतो. जन्मावेळी जर मंगल ग्रह त्या व्यक्तीचा कुंडलीतील 1, 4, 7, 8, 12 पैकी कोणत्याही एका घरात असेल तर त्या व्यक्तीला मंगल दोष असल्याचे सांगितले जाते. पण मंगल दोष हा नेहमीच अशुभ नसतो त्यामुळे मंगल पाहून लगेचच घाबरण्याचे कारण नाही. मंगल ग्रहाचे चार प्रकार पडतात अंशिक मंगल, सौम्य मंगल, धुमावदार मंगल आणि तीव्र मंगल. कुंडलीतील सातव्या घराला विवाहाचे घर म्हणतात जर मंगल सातव्या घरात असेल तर त्या व्यक्तीचा वैवाहिक जीवनात नेहमी अडचणी निर्माण होत राहतात.
मंगल दोष निवारण साठी शांती पूजा म्हणजे "भात पूजा" केली जाते. भात पूजा त्र्यंबकेश्वर मध्ये अधिकृत ताम्रपत्रधारी पंडितांचा घरी केली जाते.
अर्क विवाह म्हणजे काय ?
जर एखाद्या पुरुषाने तीन विवाह केले असतील आणि त्याचा तिन्ही पत्नीचा मृत्यू झाला असेल आणि त्या व्यक्तीला जर पुन्हा विवाह करायचे असेल तर अशा व्यक्तीचा विवाह आधी अर्क वृक्ष म्हणजेच मंदार वृक्ष सोबत केले जाते. त्यानंतर ती व्यक्ती त्याचा इच्छे नुसार वधूशी लग्न करू शकतो.
तसेच अविवाही (ब्राह्मचारी ) मुलाचा मृत्यू नंतर देखील अंत्यसंस्कार आधी त्या व्यक्तीचा मंदार वृक्षाशी विवाह लावला जातो.